बाळाला जन्म देताच कोरोनाग्रस्त आईचं निधन; डॉक्टर देवदूतासारखे धावले

बाळाला जन्म देताच कोरोनाग्रस्त आईचं निधन; डॉक्टर देवदूतासारखे धावले

जन्मानंतर आईच्या स्पर्शासाठी आसूसलेल्या त्या बाळासमोर पीपीई किट घातलेले डॉक्टर आणि नर्स फिरत होते.

  • Share this:

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आईचा मुलाला जन्म देताचं निधन झाल्याची दु:खद घटना घडली आहे. जन्म देताचा आईचं निधन झालं, त्यानंतर बाळाची प्रकृती नाजूक होती. त्याला श्वास घेता येत नव्हता, ठोकेही जाणवतही नव्हते...असे असताना बाळाला जगवण्यासाठी डॉक्टरांनी थर्शीचे प्रयत्न सुरू केले. कोरोनाची लागण बाळाही झाली असावी या शंकेने बाळाला जन्मापासून स्वतंत्र ठेवणे व उपचार केले जात होते. जन्मानंतर आईच्या स्पर्शासाठी आसूसलेल्या त्या बाळासमोर पीपीई किट घातलेले डॉक्टर आणि नर्स फिरत होते. तेच खरे त्याच्यासाठी देवदूत ठरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात जवळपास अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यात गर्भवतीलाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यानतंर आईने बाळाला सुखरुप जन्म दिला पण ती यात वाचू शकली नाही. आई गेल्यानंतर बाळाला पाहण्यासाठी कोणी येऊ शकत नव्हतं. अख्ख कुटुंबच क्वारंटाईन असल्याने डॉक्टर आणि नर्स यांच्या छायेखाली बाळ होतं.

हे वाचा-GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

जन्मानंतर पहिला तास बाळासाठी अवघड होता. पण डॉक्टर कसोशीने प्रयत्न करीत होते. दोन दिवसांनी बाळ व्हेंटिलेटरवर होतं. दोन दिवसात कोणी फिरकलं नाही. अशावेळी डॉक्टरांनी बाळावर लागणारा उपचाराचा खर्च उचलण्याचे ठरवले. चौथ्या दिवशी सैन्यात असलेल्या बाळाच्या काकांनी चौकशी केली असता बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचे कळले. बाळाला वाचवा..अशी आर्त विनंती त्यांनी डॉक्टरांकडे केली. कोरोना चाचणीनंतर बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही ते अत्यवस्थ होतं. मात्र हळूहळू बाळ उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देऊ लागलं. आज बाळ पूर्ण फिंडिंग घेत असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.

Published by: Meenal Gangurde
First published: August 12, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading