कल्याणच्या 6 महिन्याच्या बाळाने जिंकला कोरोनाचा लढा; स्वागताचा हा VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

कल्याणच्या 6 महिन्याच्या बाळाने जिंकला कोरोनाचा लढा; स्वागताचा हा VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

कल्याण पश्चिममधील एका 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. आता बाळ बरं होऊन आपल्या घरी आले आहे.

  • Share this:

कल्याण,11 एप्रिल: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्णांचा आकडा वाढत असला तरी काही रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत. त्यातच आता आनंदाची बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिममधील एका 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. आता बाळ बरं होऊन आपल्या घरी आले आहे.

मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई, सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटीतर्फे या बाळाचे जंगी स्वागत केले. टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत स्वागत केले. बाळाची आई एकदम खुश होती. तिने बाळाच्या हात वरती करत सर्वाचे आभार मानले.

हेही वााचा..नवऱ्याने कोरोना टेस्ट करायला सांगताच बायकोचा चढला पारा, नंतर झालं असं..

यावेळी नागरिकांनी मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई, पोलिस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. बाळाची काळजी घेतली जाईल आणि तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी पाठवले जाईल, असे कस्तुरी देसाई यांनी सांगितलं.

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच आनंदाचे अश्रू येतील....

कल्याण-डोंबिवलीला कोरोना हॉटस्पॉट?

कल्याण-डोंबिवलीला कोरोना हॉटस्पॉट जाहीर करावे, अशी मागणी स्थानिक आमदारांनी सरकारकडे केली आहे. डोंबिवलीत एका लग्नामुळे कोरोनाबाधितांची वाढत चाललेली संख्या, ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्याना कोरोना होण्याच्या प्रकार त्यात आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे कल्याण डोंबिवलीकर मेटाकुटीला आले आहेत. डोंबिवलीचे आमदार तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे राज्य सरकारला साकडं घातलं आहे.

हेही वाचा..  मुंबईत कॅन्सरग्रस्त वडिलांना घेऊन मुलाने आईसह केला बाईकवर 25 किमी प्रवास

कल्याण- डोंबिवलीकरांना अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाशी सामना करावा लागत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली करता विशेष मागण्या मान्य कराव्यात. कल्याण-डोंबिवलीकरांचा जीव वाचवावा अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 11, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या