Home /News /maharashtra /

...तरच महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येईल, राजेश टोपेंची केंद्राकडे पुन्हा मागणी

...तरच महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येईल, राजेश टोपेंची केंद्राकडे पुन्हा मागणी

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'राज्यात लस (vaccination) नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने आश्वासन दिले होते की....

जालना, 10 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाची (Maharashtra corona Update) परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती जर नियंत्रणात आणायची असेल तर लसीकरण (Corona vaccination ) महत्त्वाचे आहे. दर महिन्याला 1कोटी 60 लाख लशी केंद्र सरकारने द्याव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केली आहे. राज्य सरकारकडे 5 लाख 68 हजार 618 कोविडशिल्ड तर 3 लाख 92 हजार 396 कोव्हॅक्सीन असे एकूण फक्त 9 लाख 61 हजार लस उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या लसीच्या गतीनुसार धरले तर ती साडेचार लाख ते पाच लाख प्रतिदिवसानुसार हा फक्त दोन दिवसांचा साठा आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. IPL 2021 : रैनाचा स्फोटक कमबॅक, अर्धशतकानंतर CSKच्या ड्रेसिंग रूमकडे पाहून इशारा 'राज्यात लस नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने आश्वासन दिले होते की,15 तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्याला 17 लाख 93 हजार लस देण्यात येईल. परंतु, आता असं कळतं की, राज्याला फक्त 2 ते 3 लाख लसी देण्यात येईल. परंतु, एवढी कमी लससंख्या महाराष्ट्राला परवडणारी नाही' असंही टोपे म्हणाले. महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचं असेल तर केंद्राने महिन्याला 1कोटी 60 लाख लस द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केली. महाराष्ट्रातील कोरोनाची सध्यस्थिती काय? राज्यात आज (10 एप्रिल 2021) 55411 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 309 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात एकूण 53,005 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 82.18% इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.72 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. लॉकडाऊनमध्येही करा 'चीअर्स', दारुच्या होम डिलिव्हरीला मुंबई मनपाची परवानगी राज्यात आज रोजी एकूण 5,36,682 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 55,411 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33,43,951 झाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या