Home /News /maharashtra /

कोरोना वॉरिअर्सची ताकद वाढणार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा कोरोनाच्या लढाईत सहभाग

कोरोना वॉरिअर्सची ताकद वाढणार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा कोरोनाच्या लढाईत सहभाग

कोरोनाच्या लढ्यात या अनुभवी डॉक्टरांचं सहकार्य मिळणार आहे.

    मुंबई, 13 एप्रिल : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 1500 टप्पा पार केला आहे. तर मुंबईतील (Mumbai) मृत्यूची संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी विविध रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्याला डॉक्टरांनी सकारात्म प्रतिसाद दिला असून मुंबईतील नामवंत डॉक्टर कोरोनाच्या लढाईत शासनाबरोबर असल्याचे समोर आले आहे. कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील. आज या डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्या कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर असतील डॉ. संजय ओक, डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय. डॉ . नागांवकर, लिलावती रुग्णालय . डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय . डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय . डॉ . एन.डी. कर्णिक, लोकमान्य टिळक रुग्णालय शीव . डॉ . झहिर विरानी , पी . ए .के. रुग्णालय . डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय . डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय . महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 हून अधिक मृत्यू झाले आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते. तयार केलेली डॉक्टरांची टीम एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शनही करतील, तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉट लाईनवर साहाय्य करतील. डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेख ठेवेल तसेच सल्ला देईल, याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी माहिती दिली असून यावेळी त्यांनी कोरोनविषयक आढावा घेतला. संबंधित - Coronavirus : पुण्यात मास्कविना फिरणाऱ्या तरुणाला कोर्टाचा दणका कोरोना: :जीवनदायी ठरतेय 'ही' जुनी उपचार पद्धत, 5 रुग्ण अगदी ठणठणीत झाले
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या