वापरलेले PPE कीट, Mask फेकले नदीपात्रात; संगमनेरमधील धक्कादायक प्रकार

वापरलेले PPE कीट, Mask फेकले नदीपात्रात; संगमनेरमधील धक्कादायक प्रकार

प्रवरा नदीपात्रातील जुन्या पुलाजवळ हा सर्व गोळ्या औषधासह वापरलेल्या पीपीई कीटचा साठा सापडला

  • Share this:

शिर्डी, 29 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा...PPE किट बनवणाऱ्या कंपनीतच घुसला कोरोना, तब्बल 44 कर्मचारी पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. त्याच ठिकाणी या वस्तू पडल्या असल्याने नागरिकही धास्तावले आहेत.

संगमनेर शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात त्याच ठिकाणी वापरलेले अनेक पीपीई कीट आणि औषधे उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रातील जुन्या पुलाजवळ हा सर्व गोळ्या औषधासह वापरलेल्या पीपीई कीटचा साठा सापडला आहे. याच ठिकाणाच्या जवळ कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्यू नंतर अंत्यसंस्कार केले जातात. याच ठिकाणच्या जवळ ह्या सर्व वस्तू नदीपात्रात फेकण्यात आल्या आहेत. या वस्तू नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमधून येथे फेकल्या गेल्या याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही आहे.

हेही वाचा...GOOD NEWS! ऑगस्टमध्येच उपलब्ध होणार कोरोना लस; रशियाचा दावा

मात्र, सदर प्रकार अतिशय गंभीर असून अशा प्रकारे वस्तू फेकणे अत्यंत धोकादायक आहे. जर या वस्तू कोरोनाबाधित रूग्णालयातील असतील तर इतरांनाही यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असताना ज्या पद्धतीने या सगळ्या वस्तू फेकण्यात आल्या आहेत हे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक असून अशा पद्धतीने वापरलेले पीपीई कीट आणि औषधी फेकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 29, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या