अखेर प्रशासनाला जाग! भिवंडीतील तीनबत्ती भाजीमार्केट 14 एप्रिलपर्यंत बंद

अखेर प्रशासनाला जाग! भिवंडीतील तीनबत्ती भाजीमार्केट 14 एप्रिलपर्यंत बंद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. तरी देखील या काळात भिवंडी शहरात सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती.

  • Share this:

भिवंडी, 8 एप्रिल:कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. तरी देखील या काळात भिवंडी शहरात सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती. एवढेच नाही तर शहरातील तीनबत्ती भाजीमार्केट येथे दररोज हजारो नागरीक भाजी खरेदीच्या बहाण्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत होते. याबाबत 'न्यूज 18 लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे मनपा प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

महापौर प्रतिभा विलास पाटील, मनपा आयुक्त डॉ प्रविण आष्टीकर यांनी अखेर बुधवारी गंभीर दखल घेत तीनबत्ती येथील घाऊक व किरकोळ भाजी विक्री येत्या 14 एप्रिलपर्यंत बंद केली आहे.

हेही वाचा..यवतमाळ जिल्ह्यात 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, 7 जणांचे 'तबलिगी' कनेक्शन

शहरातील तीनबत्ती ते नजराणा कंपाऊंड येथील भाजी मार्केट मध्ये पहाटेच्या सुमारास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसोबत नागरीक तोंडावर मास्क न लावता गर्दी करीत असल्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यासाठी महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने याबाबत फक्त 'न्यूज 18 लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अखेर भाजीमार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा...डोंबिवलीत धोका आणखी वाढला, एकाच कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण

शहरातील घाऊक भाजी विक्रेत्यांनी पोगाव येथील नियोजित जागेवर खरेदी व्यवहार करण्यात येणार आहे. संबंधित किरकोळ विक्रेत्यास त्यांच्या प्रभागात जाण्यासाठी फक्त भाजीविक्रेते म्हणून ओळखपत्र दिले जाणार आहे. विक्री परिसरात सोशल डिस्टंसिंग बाळगत आपला व्यवसाय करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणे, असं आवाहन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 9, 2020, 12:41 AM IST

ताज्या बातम्या