मोठा दिलासा.. जळगाव झालं 'कोरोनामुक्त', रुग्णानं केली कोरोनावर मात

मोठा दिलासा.. जळगाव झालं 'कोरोनामुक्त', रुग्णानं केली कोरोनावर मात

जळगावातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे.

  • Share this:

जळगाव, 15 एप्रिल:  पंधरा दिवसांपूर्वी शहरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मात्र, पंधरा दिवस उपचारानंतर मंगळवारी रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जळगावातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, जळगावमध्ये कोरोनबाधित दोन रुग्ण आढळले होते. एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता तर आता दुसऱ्याने कोरोनावर विजय मिळवला आहे. या रुग्णांला आज (बुधवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात रुग्णाला घरी सोडण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हा रुग्ण उपचार घेत होता. 14 दिवसांनंतर 24 तासांत या रुग्णाच्या दोन तपासण्या करण्यात आल्या. त्या दोन्ही तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या रुग्णास डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनासारख्या आजाराला पळवून लावण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घेतल्याचे  सिव्हील सर्जन  डॉ. एन. एस. चव्हाण  यांनी सांगितलं.

काय म्हणाले जिल्हाधिकारी...

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  म्हणाले की, पहिला संशयित हा 28 मार्चपासून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत होता. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा पहिला अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. त्याचा दुसरा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाला. अहवाल "निगेटिव्ह' आला. त्यामुळे हा रुग्ण "कोरोना'मुक्त झाला असून त्याला बुधवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्‍त झाला आहे.

वाचा - एसटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी भंगार बसचं 'सॅनेटायझर मशीन'मध्ये केलं रुपातंर

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जळगाव शहरात काही अपवाद वगळता लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत आहे. जळगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला होता. आता त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.  आहे. त्यामुळे आज पहिल्या कोरोना रुग्णाची आज ४ ते ५ वाजे दरमान्य सुट्टी होणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

सरोगसीने जन्मलेल्या बाळाची तब्बल 17 दिवसांनी झाली भेट; आई-बाबांचे डोळे आले भरुन

First published: April 15, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या