मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महापुरानंतर कोरोनाचं मोठ संकट! रेडझोनमधून येणार्‍यांना कोल्हापूरात NO ENTRY?

महापुरानंतर कोरोनाचं मोठ संकट! रेडझोनमधून येणार्‍यांना कोल्हापूरात NO ENTRY?

संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात अग्रेसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. गेल्यावर्षी महापुराचं मोठ संकट झेलल्यानंतर 2020 या नव्या वर्षातच कोल्हापूर समोरही कोरोनाचे संकट उभं ठाकलं.

संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात अग्रेसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. गेल्यावर्षी महापुराचं मोठ संकट झेलल्यानंतर 2020 या नव्या वर्षातच कोल्हापूर समोरही कोरोनाचे संकट उभं ठाकलं.

संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात अग्रेसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. गेल्यावर्षी महापुराचं मोठ संकट झेलल्यानंतर 2020 या नव्या वर्षातच कोल्हापूर समोरही कोरोनाचे संकट उभं ठाकलं.

कोल्हापूर,16 मे: संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात अग्रेसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. गेल्यावर्षी महापुराचं मोठ संकट झेलल्यानंतर 2020 या नव्या वर्षातच कोल्हापूर समोरही कोरोनाचे संकट उभं ठाकलं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोल्हापूरमध्ये मात्र ती नियंत्रित होती. पण आता हीच संख्या वाढत असल्यानं कोल्हापुरकरांची चिंता वाढली आहे. हेही वाचा... मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाणांना 'त्या' वक्तव्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमधील अनेक चाकरमाने हे मुंबई-पुण्यात कामानिमित्त आहेत. पण मुंबई-पुणे हे दोन्ही विभाग रेड झोनमध्ये गेल्याने अनेक चाकरमानी आता कोल्हापूर जिल्ह्यात परतत आहेत. एका दिवसात मुंबई-पुण्याहून 600 गाड्या कोल्हापूर जिल्ह्यात येत असून रेडझोनमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यात पाठवू नका, त्यांना परवानगी देऊ नका अशी मागणी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. जरी मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांचं स्क्रिनिंग केलं जात असलं तरी ही कोरोनाचा संसर्ग वाढण्यास हीच गर्दी किंवा ही वाहतूक कारणीभूत ठरू शकते यात शंका नाही आणि म्हणूनच कोल्हापूरकरांच टेन्शन वाढलं आहे त्यातच आरोग्य आणि पोलिस यंत्रणेवरही ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण सापडले असून त्यातील सात जण हे मुंबईहून जिल्ह्यात परतले होते. तर दोन जण सोलापूरमधून आले होते. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातला कोरोनाचा आकडा हा 25 च्या आत होता पण आता हा आकडा 37 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे ऑरेंज झोनमध्ये असलेला कोल्हापूर जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. त्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस पालकमंत्री सतेज पाटील यांनी आटोकाट प्रयत्न केले, पण आता बाहेरून येणार्‍या नागरिकांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा विळखा घालण्याची शक्यता आहे. हेही वाचा...मुंबईत कोरोनाचा कहर! वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये रुपांतर होणार दरम्यान, कोल्हापूरमध्ये ज्या एमआयडीसी आहेत. त्या एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये कामानिमित्त होते. पण या सगळ्या कामगारांना आता पुन्हा त्यांच्या मूळगावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत कोल्हापूरमधून 7 विशेष श्रमिक रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये रवाना झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला बाकी कुठलं संकट सतावत नाही आहे. हे नक्की असले तरी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची जी संख्या आहे. ती नियंत्रित केली नाही तर नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यालाही रेडझोनचा धोका आहे. त्यामुळे सध्याच्या काळात तरी कोल्हापूरकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे..
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Kolhapur

पुढील बातम्या