Home /News /maharashtra /

Covid19: पोलिसांभोवती Corona चा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31

Covid19: पोलिसांभोवती Corona चा विळखा; गेल्या 24 मुंबईत 81 पोलीस पॉझिटिव्ह, पुण्यातला आकडा 31

मागील तीन दिवसातील राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

मागील तीन दिवसातील राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Corona Virus Updates: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं (Corona Virus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत चालली आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं (Corona Virus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईतील 81 पोलिसांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारी दिली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 1312 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या एकूण 126 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पुण्यात शनिवारी 31 पोलीस कर्मचारी (Pune Police)कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 465 झाली आहे. मुंबईत शनिवारी 10661 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, 11 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. शहरात सध्या 73518 सक्रिय रुग्ण आहेत. सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा त्याच वेळी महाराष्ट्रात 42 हजार 462 नवीन रुग्ण आढळले आणि 23 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने शनिवारी ही माहिती दिली. राज्यात सध्या 2,64,441 सक्रिय रुग्ण आहेत. यासह राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात ओमायक्रॉनची एकूण 1730 प्रकरणे समोर आली आहेत. 21 हजारांहून अधिक लोकांची कोरोनावर मात दुसरीकडे, शनिवारी मुंबईत 21 हजार 474 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकाच दिवसात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या आधारे जर ट्रेंड पाहिला तर 10 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत दररोज 11 हजार ते 14 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अपवाद म्हणून 12 जानेवारीला 16 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. यापूर्वी सलग चार दिवस (6 जानेवारी ते 9 जानेवारी) कोरोनाचे रुग्ण 20 हजारांहून अधिक किंवा त्याच्या जवळपास आले होते. मुंबई: ऑनलाईन पिझ्झा मागवणं महिलेच्या अंगाशी, बसला 11 लाखांचा गंडा मुंबईतील धारावी भागाबद्दल बोलायचं झाले तर, शनिवारी येथे 40 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे दादरमध्ये 120 आणि माहीममध्ये 126 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. या तीन भागात एकूण 286 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 8 लाख 99 हजार 358 लोक कोरोनाने बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 91 टक्के आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 73 हजार 518 आहे. मुंबईतील कोरोनाची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 43 दिवसांवर पोहोचला आहे. पुण्यात 5,705 नवे रुग्ण पण मुंबईच्या तुलनेत पुण्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. नवीन प्रकरणाच्या तुलनेत येथे बरे होणाऱ्यांची संख्या निम्मी आहे. ही चिंतेची बाब आहे. पुण्यात शनिवारी 5 हजार 705 नवीन रुग्ण आढळले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai police

    पुढील बातम्या