मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा राज्यात अधिक फैलाव, तब्बल 88 टक्के रुग्णांना संसर्ग

कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा राज्यात अधिक फैलाव, तब्बल 88 टक्के रुग्णांना संसर्ग

Delta Variant in Maharashtra: लसीकरण (Corona Vaccination) झालेल्या लोकांनाही या व्हेरिएंटची लागण होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट:  महाराष्ट्रात (Maharashtra State)राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आली. मात्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटनं (Delta Variant) डोकं वर काढलं आहे. राज्यात सातत्यानं कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सातत्यानं फैलाव होताना दिसतोय. लसीकरण (Corona Vaccination) झालेल्या लोकांनाही या व्हेरिएंटची लागण होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे.

जुलै महिन्यात राज्यातील 88 टक्के रुग्णांना B.1.617.2 स्वरुपाच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं. चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येही हाच कल दिसून आला. इंडियन सार्स-कोव-2 जिनोमिक कन्सॉर्शिया (INSSOG) नं रविवारी हा ताजा अहवाल जारी केला. त्यामुळे सरकार चांगलंच चिंतेत आहे. पुढे या अहवालात म्हटलं आहे की, 28 प्रयोगशाळांकडून करण्यात आलेल्या 51,996 नमुन्यांपैकी 11968 नमुने राज्यातील होते. अनेक राज्यातही हा व्हायरस आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना याची लागण होत आहे.

Coronavirus: लस घेतलेल्यांसाठीही डोकेदुखी ठरतोय कोरोना; जाणून घ्या यामागचं कारण

राज्यानुसार रुग्णांची आकडेवारीनुसार

केरळ- 5554 (10.7 टक्के)

नवी दिल्ली- 5354(10.3 टक्के)

ओडिशा- 2511(4.8 टक्के)

पंजाब- 2071 (4 टक्के)

दुसरीकडे राज्यातल्या रुग्णसंख्येत घट

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी 4 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर गेला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 4 हजार 141 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Coronavirus