मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Omicron Variant मुळे प्राथमिक शाळा सुरु होणार?, राजेश टोपेंनी केलं महत्त्वाचं वक्तव्य

Omicron Variant मुळे प्राथमिक शाळा सुरु होणार?, राजेश टोपेंनी केलं महत्त्वाचं वक्तव्य

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 28 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातही खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानं 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज आढावा बैठक

महाराष्ट्रातही सरकारनं (State Government) नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत.

हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी, भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना Corona ची लागण

दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंद घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील.

कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली

राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य सरकारने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.

हेही वाचा- पुणे सोलापूर महामार्गावर Terrible Accident, 5 जागीच ठार; 6 गंभीर जखमी

राज्य सरकार तसंच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसंच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Rajesh tope