आपल्यालाही कोरोना होईल, या धास्तीनं वृद्धानं गळफास घेऊन केली आत्महत्या

आपल्यालाही कोरोना होईल, या धास्तीनं वृद्धानं गळफास घेऊन केली आत्महत्या

कोरोनाबाधित कुटुंब घरा शेजारी राहतं. त्यामुळे आपल्यालाही आता कोरोणाची लागण होईल

  • Share this:

सांगली, 6 जून: कोरोनाबाधित कुटुंब घरा शेजारी राहतं. त्यामुळे आपल्यालाही आता कोरोणाची लागण होईल, या धास्तीनं एक ज्येष्ठ नागरिकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे ही घटना घडली आहे.

हेही वाचा...महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, प्रशासनानं दिली सक्त ताकीद

दिगंबर कृष्णा खांडेकर ( वय- 68) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घराशेजारी एसटी चालकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीती पोटी दिगंबर खांडेकर यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, शेटफळे येथील एसटी चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आल्याने गावात कंटेन्मेट झोन तयार करण्यात आला आहे. त्याच एसटी चालकाच्या कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाबाधित कुटुंब दिगंबर खांडेकर यांच्या घराशेजारी राहते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी खांडेकर यांनी ताप येत असल्याचं गावातील आरोग्य सेवकाला सांगितलं होत. तसेच कोरोनाची भीती वाटत असल्याचंही खांडेकर म्हणाले होते. आरोग्य सेवकाने गोळ्या देऊन घाबरण्याचं कारण नसल्याचं खांडेकर यांना सांगितलं होते. नंतर खांडेकर घरी आले.

हेही वाचा.. कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर

मात्र, कोरोनाच्या धास्तीने ते अस्वस्थ होते. दोन दिवसांपासून भीतीत वावरत असलेल्या खांडेकर यांनी शुक्रवारी रात्री जनावरांच्या गोठ्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

First published: June 6, 2020, 1:16 PM IST

ताज्या बातम्या