सांगलीत सापडलेल्या 'त्या' चार कोरोना बाधितांच्या 7 नातेवाईकांना रुग्णालयात केलं दाखल

सांगलीत सापडलेल्या 'त्या' चार कोरोना बाधितांच्या 7 नातेवाईकांना रुग्णालयात केलं दाखल

चारही कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात 34 जण आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर जवळच्या संपर्कातील 7 नातेवाईकांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

  • Share this:

सांगली, 24 मार्च:  सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये सापडलेल्या 'त्या'चार कोरोना बाधित रुग्णांच्या 7 नातेवाईकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चारही कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात 34 जण आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर जवळच्या संपर्कातील 7 नातेवाईकांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी माहिती दिली आहे.

मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप

कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मिरज येथे संचारबंदीतही नागरिक अन्न, धान्य, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मार्केट परिसरात गर्दी केली होती. गर्दी झालेली पाहून पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्री बंद केली. भाजीपाला विक्रेत्यांना व नागरिकांना हलवून दिले रस्त्यावर दुचाकी वरून विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. मास्क न वापरता फिरणाऱ्यांना ही पोलिसांनी चोप देऊन उठाबशा काढायला लावल्या. मिरजेतील होम क्वारंणटाईन केलेली महिला बाहेर फिरत असल्याने तिला महापालिका प्रशासनाने इन्स्टिट्यूट क्वारंणटाईन केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 वर पोहोचल्यानं भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यू लागू केला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.

मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

दुसरीकडे, कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रभाव वाढत चालला असून कोरोनाबाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे. अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे. सदरच्या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही त्रास होत होता. जेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर काल संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 97 होती पण आता कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2020 03:13 PM IST

ताज्या बातम्या