मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना व्हायरसची अफवा पसरवल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसची अफवा पसरवल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल


'पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून 'महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण' स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता'

'पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून 'महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण' स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता'

'पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून 'महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण' स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता'

पंढरपूर, 15 मार्च :  जगभरात  हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आता महाराष्ट्रातही हैदौस घातला आहे. कोरोना व्हायरसची अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात स्वेरी कॉलेजचे प्राध्यापक मुकुंद मारुती पवार यांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपुरातील विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून 'महाराष्ट्रात आणखी एक आढळला कोरोना रुग्ण' स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता विद्यार्थी; संस्थेने फेटाळला सुट्टीचा अर्ज' अशा आशयाचा मजकूर एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन खोटी बातमी तयार केली.

स्वेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाने ती बातमी पाहिली. त्यानंतर त्या पालकाने कॉलेजमधील प्राध्यापकांना फोन करुन संबंधीत बातमीबाबत चौकशी केली. परंतु, असा कोणताही प्रकार घडला नव्हता. त्यामुळे प्राध्यापकांनी घाबरू नका, असा प्रकार घडला नाही, असं सांगितलं.

या बातमीद्वारे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तसंच श्री विठ्ठल एज्युकेशन अँ‍ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची बदनामी केली म्हणून प्राध्यापक मुकुंद पवार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

'कोरोना'बद्दल राज्य सरकारचा निर्णय डावलून भरवली यात्रा, साताऱ्यात पहिला गुन्हा दाखल

दरम्यान,  कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारने उपायोजना जाहीर करण्यात आल्या आहे. मात्र, साताऱ्यात शासकीय उपाययोजनेत अडथळा निर्माण केल्याने पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यातील बावधन यात्रा समितीवर राज्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन यात्रा संयोजन समितीने पोलीस विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिनांक 12 ते 13 मार्च रोजी यात्रेचे आयोजन केले होते. छबिना कार्यक्रमात आणि बगाड पाहण्यासाठी बावधन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमा केली.

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण केला. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सचिन शिवाजीराव जाधव यांनी तक्रार दाखल केल्यामुळे भारतीय दंड विधान संहिता कलम 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 कलमान्वये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

या समितीचे अध्यक्ष राजेंद्र आबाजी भोसले, उपाध्यक्ष दीपक दीलीप ननावरे, सचिव अंकुश जगन्नाथ कुंभार, खजिनदार सचिन आप्पासो भोसले,  सदस्य संभाजी शिवाजी दाभाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: