Home /News /maharashtra /

कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेलाच झाली कोरोनाची लागण

कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेलाच झाली कोरोनाची लागण

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं केलेल्या रिसर्चनुसार आता जगात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देश उरले आहेत ज्यात अद्याप कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला नाही आहे. पाहूयात कोणते आहेत हे 9 देश...

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं केलेल्या रिसर्चनुसार आता जगात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देश उरले आहेत ज्यात अद्याप कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला नाही आहे. पाहूयात कोणते आहेत हे 9 देश...

राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

    कल्याण, 31 मार्च: राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला असून 225 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यात कल्याणमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही महिला मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करते. हॉस्पिटलमध्ये काम करतानाच तिला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. लक्षणं आढळल्याने तिची चाचणी करण्यात आली होती. तिचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. हेही वाचा...सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनातही 60 टक्के कपात राज्यात रुग्णांची संख्या वाढली.. दरम्यान, राज्यात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला. हेही वाचा...अजित पवारांच्या मोठ्या निर्णयावर नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले... कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. आज लॉकडाऊनचा 7 वा दिवस आहे, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे. हेही वाचा...सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन दिलीप वळसे पाटील यांची अखेर उचलबांगडी कोरोनामुळे सोमवारी दोन जणांचा मृत्यू राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या