वाशिम, 31 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भर पडत असल्यानं नागरिकांमध्ये कोरोनाबाबत दहशत पसरली आहे. त्यात शासकीय रुग्णालयातून पलायन करून एका कोरोनाबाधित रुग्णांनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत्य व्यक्ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रहिवासी आहे.
हेही वाचा...औरंगाबाद हादरलं! 3 सख्ख्या भावांसह 5 जणांचा पाझर तलावात बुडून मृत्यू
40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी या रुग्णांनं रुग्णालयातून पलायन केलं होतं. त्याचा शोध सुरू असतांना शुक्रवारी त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाशिम च्या सामान्य रुग्णालयात कारंजा शहरातील 40 वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू होते. दरम्यान हा रुग्णांनं 29 जुलै रोजी रुग्णालयातून पळ काढला होता. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, रुग्ण कुठेही आढळून आला नाही. शुक्रवारी एका व्यक्तीची चप्पल आणि चष्मा हा कारंजा-खेर्डा मार्गावरील चोर आंब्याजवळील एका शेतातील विहिरीजवळ आढळून आला. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. विहिरीबाहेर आढळलेली चप्पल आणि चष्मा त्या रुग्णांचा असल्याची खात्री पटली. विहिरीत डोकाऊन पाहिले असता, रुग्णाचा मृतदेह आढळून आला. नंतर प्रशासन आणि पोलिसांनी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या सहकार्याने संबंधित रुग्णाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. कोरोनाच्या धास्तीनं रुग्णांनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हेही वाचा...लॉकडाऊन बळी! उपासमारीची वेळ आलेल्या ST कर्मचाऱ्यानं पत्नीच्या साडीनं लावला गळफास
31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन....
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं अद्याप नाव घेत नाही आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली राहणार आहे. शाळा, हॉटेल, सिनेमागृह, धार्मिक स्थळे लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहे.