डोंबिवलीत धोका आणखी वाढला, एकाच कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण

डोंबिवलीत धोका आणखी वाढला, एकाच कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

  • Share this:

कल्याण, 8 एप्रिल:  मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली पूर्वेत आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत. आता कल्याण- डोंबिवलीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

केडीएमसीने आता या दोन्ही महिलांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा..पुढील 7-8 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे, आरोग्यमंत्र्यांनी दिला इशारा

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा..पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू!

महापौरांना करायची आहे पुन्हा रुग्णसेवा...

दुसरीकडे, केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा रुग्ण सेवा करायची आहे. महापौर नगरसेविका होण्याआधी मुंबई महानगर पालिकेच्या बी.वाय.एल नायर रुग्णालयात 32 वर्षे परिचारिका म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्ण सेवा करण्याची इच्छा दर्शवली आहे. तसे पत्र सुद्धा आयुक्तांना देऊन कायदेशीर अनुमती सुद्धा मागितली आहे.

महापौर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थिती माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स परिचरिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत असताना मी पेशाने परिचारीका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नाही म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी सेवा देण्याची माझी इच्छा आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 8, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या