मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी

कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी

साईबाबांनी महामारी गावात येवू नये यासाठी गावाच्या भोवती पिठाची रांगोळी काढल्याचं साईचरीत्रात नमूद आहे. तोच धागा पकडून महिलांनी रांगोळी काढली.

साईबाबांनी महामारी गावात येवू नये यासाठी गावाच्या भोवती पिठाची रांगोळी काढल्याचं साईचरीत्रात नमूद आहे. तोच धागा पकडून महिलांनी रांगोळी काढली.

साईबाबांनी महामारी गावात येवू नये यासाठी गावाच्या भोवती पिठाची रांगोळी काढल्याचं साईचरीत्रात नमूद आहे. तोच धागा पकडून महिलांनी रांगोळी काढली.

 शिर्डी 08 मार्च : शिर्डी शहरात कोरोना व्हायरसचा शिरकाव होवू नये यासाठी आज महिला दिनाचं औचित्य साधत महिलांनी शहर परीक्रमा करत पिठाची रांगोळी काढलीय. साईबाबांनी महामारीचा शिरकाव रोखण्यासाठी पिठाची रांगोळी काढली होती त्याचेच अनुकरण आज या महिलांनी केलेय. ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डी या संघटनेच्या माध्यमातून  शिर्डीतील महिला कोरोना व्हायरसच्या विरोधात एकवटल्या होत्या. साईबाबांनी महामारी गावात येवू नये यासाठी गावाच्या भोवती पिठाची रांगोळी काढल्याचं साईचरीत्रात नमूद आहे. तोच धागा पकडून महिलांनी आज शिर्डी शहराला परीक्रमा मारत पिठाची रांगोळी काढलीय.

साईबाबांवर आमची अपार श्रद्धा असून साईबाबां आम्हाला या व्हायरसपासून दूर ठेवतील हा विश्वास या महिलांनी व्यक्त केला. देश विदेशातुन मोठ्या संख्येने शिर्डीत भाविक येत असतात. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध सूचनाफलक शिर्डीत लावण्यात आले आहेत. साई मंदिरातील साफ सफाई देखील वाढवण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना देखील विशेष काळजी घेण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी विवीध उपाययोजना होत असताना साई परिक्रमाच्या माध्यमातुन आज महिलादिनी महिलांनी साईबाबांना कोरोनाची इडा पिडा टळो असं साकडं घातलं.

जगभरात पसरणाऱ्या या कोरोना व्हायरसविषयी लोकांना अनेक प्रश्न पडतात.या आजाराची लक्षण कोणती, नॉर्मल सर्दी-खोकल्या पेक्षा या कोरोना कसा वेगळा आहे,असे प्रश्न सर्वसामान्यांना पडता आहेत.

नॉर्मल सर्दी-खोकला, ताप आणि कोरोना व्हायरस या तिन्ही आजारांची लागण ही हवेत पसरणाऱ्या जंतूमुळे होते.तिन्ही आजार हवेमध्ये पसणाऱ्या जंतूमधून शरीरात प्रवेश करतात.

उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’

सर्दी-खोकला, ताप आणि कोरोना व्हायरस या आजारांमध्ये फरक काय?

कोरोना व्हायरस : कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते.

सैन्याचे 25 लाख युनिफॉर्म विकले गेले, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

सर्वसाधारण ताप : तुम्हाला व्हायरल ताप आला असेल तर कोरडा खोकला, अंगदुखी, थकवा जाणवतो. या फ्लूमध्ये सर्दी देखील होते. संसर्ग झाल्यानंतर 1 ते 4 दिवसांमध्ये आजार बळावतो. तर हा ताप आठवड्याभरात बरा होतो. जर तुम्हाला जास्त ताप येत असेल तर बरं होण्यासाठी जास्त लागतील.

सर्दी-खोकला : हवामानात बदल झाल्यानंतर सर्दी खोकला होतो. सर्दी-खोकला झाल्यास अनेकदा हलकासा तापदेखील येतो. यामध्ये देखील तुमचं शरीर दुखतं, डोकं दुखत. सर्दी-खोकला साधी औषधं- गोळ्या घेतल्यानंतर बरा होतो. हा बरा होण्यासाठी 5 ते 8 दिवस लागतात.

धडाकेबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार

तुम्हाला झालेला सर्दी-खोकला 5 ते 7 दिवसांच्या वर राहिला किंवा ताप येत राहिला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणं आणि तपासणी करणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य टेस्ट करून उपचार घेतल्यास कोरोना सारखा आजार देखील बरा होतो.

First published:

Tags: Corona virus, Shirdi