होम क्वारंटाइनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास होईल कायदेशीर कारवाई

होम क्वारंटाइनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास होईल कायदेशीर कारवाई

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना 'होम क्वारंटाइन'च्या सूचना दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना 'होम क्वारंटाइन'च्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरातच राहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने शनिवारी महसूल आणि पोलिस यंत्रणेला दिले आहेत.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत, अशाना होम क्वारंटाइनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा..असा होऊ शकतो महाभयंकर कोरोनाव्हायरचा नाश, चीनने सांगितला उपाय

मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाइनचे आदेश आहेत, त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून शनिवारी सांगण्यात आले.

हेही वाचा.. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोदी अ‍ॅक्शनमध्ये, औषध कंपन्यांनसाठी दिले 14 हजार कोटी

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकूण 12 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

हेही वाचा..म्हशीची धार काढण्यापासून ते थेट PSI, शेतकरी पुत्राचा थक्क करणारा प्रवास

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

First published: March 21, 2020, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading