• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • नाशिकमध्ये कोरोनाचा कहर! आता Parle-G बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव

नाशिकमध्ये कोरोनाचा कहर! आता Parle-G बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव

पार्ले जी कंपनीतील 6 कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी), नाशिक, 17 जुलै: संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घालतं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमधील एका नामांकित बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पार्ले जी कंपनीतील 6 कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या आधी सातपूर औद्योगिक वसाहतमधील नामाकिंत  औषध निर्मित्या कंपनीतील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आलं होतं. हेही वाचा..धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग नाशिक पाठोपाठ आता इगतपुरी औद्योगिक वसाहतीत कोरोना शिरकाव झाला आहे. पार्ले जी बिस्किट उत्पादक कंपनीतील 6 कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित कर्मचारी काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकच्या गोंदे येथील एकाच कंपनीत गुरुवारी एकाच वेळी 93 कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. कामगार वर्गात मोठी दहशत... सातपूर औद्योगिक वसाहतमधील 'ग्लेनमार्क' या नामांकित फार्म कंपनीतील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाने आता थेट औद्योगिक वसाहतीत शिरकाव केल्यानं कामगार वर्गात मोठी दहशत पसरली आहे. हेही वाचा... पुण्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात, नातेवाईक अशी घेतात आरोपींची भेट 'ग्लेनमार्क' ही औषध निर्मिती करणारी कंपनी सातपूर औद्योगिक वसाहतीत आहे. या कंपनीतील तब्बल 20 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. कोरोनाबाधित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, हे कर्मचारी काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या घटनेमुळे मात्र सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.
  Published by:Sandip Parolekar
  First published: