मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाची पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपुरात 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाची पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे.

    नागपूर, 13 मार्च:कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आता 3 झाली आहे. 'कोरोना'ची लागण झालेल्या रुग्णाची पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात आणखी एक रुग्ण आढळला आहे. आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात एक-एक रुग्ण गुरुवारी आढळला. तर पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे. मुंबईहून आलेल्या एका दाम्पत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं होतं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. एक रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आल्याचं उघड झालं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या 33 वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. हेही वाचा..कोरोनाचं थैमान! IPL लांबणीवर; अनेक राज्यांत शाळा बंद, सार्वजनिक आयुष्य ठप्प कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील 35 वर्षीय तरुण तसेच हिंदूजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला 64 वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु आहे. राज्यात एकूण 50 नवीन संशयित रुग्णालयात दाखल झाले आहेत. हेही वाचा..‘कोरोना’ची माहिती घेण्यासाठी Link ओपन करताना सावधान, रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक अमेरिकेहून परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयित आढळले आहेत. त्यांच्यात लक्षणं दिसल्यामुळे आणि परदेशातला प्रवास लक्षात घेऊन त्यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचे स्वॅब लॅबमध्ये देण्यात आले आहेत. या सर्व संशयितांचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 60 पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा दिल्ली राज्य सरकारने शाळा, मॉल आणि चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहं आणि मॉल 31 मार्चपर्यंत बंद राहतील. शाळा आणि कॉलेजेसना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. हेही वाचा..कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी, 96 हजार विद्यार्थी चिंतेत अशी घ्या काळजी कोरोनामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं आणि आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे. हात वारंवार साबणानं धुवा. कोरोना आणि मांसाहार यांचा थेट संबंध नसला तरीही अर्धवट शिजलेलं आणि कच्चं मांस खाणं टाळा. फळे, भाज्या न धुता खाऊ नका.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या