Corona Virus In India: कोरोनाची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारनं (State Government) निर्बंध मागे घेतले. मात्र निर्बंध मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
जालना, 01 मे: राज्यात (State) पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) चिंता वाढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोनानं पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. कोरोनाची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारनं (State Government) निर्बंध मागे घेतले. मात्र निर्बंध मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सध्या राज्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
देशात सध्या पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकही घेतली होती. तसंच संबंधित राज्यांना काळजी घेण्यासही सांगितलं. यावरही राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्क सक्ती करावी लागेल असं स्पष्ट म्हटलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले राजेश टोपे
महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णसंख्या कमी आहे. राज्य रुग्णसंख्येच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीनं झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.
राजेश टोपेंचं नागरिकांना आवाहन
सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच भविष्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्क सक्ती करावी लागेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारनं निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं राज्याची चिंता वाढली आहे. यावर अजित पवार यांना राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का?, अजित पवार यांनी दिलं उत्तर
करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानी मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पुन्हा मास्क वापरण्यासाठी सांगायचं की नाही यावरही चर्चा झाली. सद्यपरिस्थिती पाहता लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं असल्याचं ते म्हणालेत. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेऊ असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचंही ते म्हणालेत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचे संकट कमी झालं असलं तरी अजून ते संपलं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.