VIDEO : कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाला घरघर, साडे तीन लाख कोंबडीच्या पिल्लांना जिवंत गाडलं

कोरोना भारतात वाढत्या संसर्गामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोना भारतात वाढत्या संसर्गामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 15 मार्च : कोरोना भारतात वाढत्या संसर्गामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसपेक्षाही जास्त वेगानं सोशल मीडियावर अफवा पसरत असल्यानं याचा फटका व्यवसायिकांना बसला आहे. कोरोनाचा फटका सर्व स्तरावर बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली असून महाराष्ट्रात 31 रुग्ण आढळले आहेत. चिकन खाल्ल्यानं कोरोनाचा धोका आहे असा काही दिवसांपूर्वी संदेश फिरत होता. त्याचा फटका सर्वाधिक महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायिकांना बसला आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. तर काहींनी कोरोनाच्या भीतीनं हा व्यवसाय बंद केला आहे. कोल्हापुरातील एका पोल्ट्री फर्मचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोल्ट्री मालक कोरोनाच्या भीतीनं 2 लाख अंडी खड्ड्यात फेकून दिली आहे इतकंच नाही तर साडे तीन लाख कोंबडीची पिल्लं जिवंत गाडली आहेत. त्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-सर्दी, खोकला झाल्यानं गेली दवाखान्यात, चीनमधून आल्याचं सांगताच डॉक्टर झाले गायब कोरोनाच्या भीतीमुळे पोल्ट्री व्यावसायिकानं हे पाऊल उचचलं आहे. जवळपास दोन लाख अंडी आणि साडे तीन लाख पिल्लं या व्यवसायिकानं फेकून दिली आहेत. तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पोल्ट्री व्यवसायिकांनी अक्षरश: 5 आणि 10 रुपयांनी कोंबडी विकायला सुरुवात केली आहे. आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी भागातील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. कोंबडी आणि अंड्याला भाव मिळत नसल्यानं त्यांनी काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. ही सर्व अंडी आणि कोंबडी नष्ट केली आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे. त्यातच आता एका टूर कंपनीसोबत परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. हे वाचा-एकीकडे ट्रक पेटला होता आणि गावकरी गव्हाची पोती पळवून नेत होती, पाहा हा VIDEO
First published: