Home /News /maharashtra /

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव, या 24 जिल्ह्यांमध्ये लक्ष ठेवण्याची गरज

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव, या 24 जिल्ह्यांमध्ये लक्ष ठेवण्याची गरज

Corona Virus In Maharashtra: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंटचाही (Delta Plus Variant) प्रार्दुभाव वाढू लागला आहे. राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकंवर काढलं आहे.

  मुंबई, 26 ऑगस्ट: राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. मात्र देशात कोरोनाची तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोनाबाधित ( corona patients) रुग्णांची संख्या आज अचानक वाढली आहे. तसंच कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंटचाही (Delta Plus Variant) प्रार्दुभाव वाढू लागला आहे. राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकंवर काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा पल्स व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वाढ असून सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत बाधितांचं प्रमाण वाढलेलं नाही. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. सोमवारी नव्यानं 27 डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 103 वर गेली आहे. जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून आता एकूण 24 जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचं निदर्शनास आलं आहे. विदर्भ आणि कोकण विभागात 50 टक्के रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची आकडेवारी जळगाव- 13 रत्नागिरी- 15 मुंबई- 11 कोल्हापूर- 7 ठाणे- 6 पुणे- 6 अमरावती- 6 गडचिरोली- 6 नागपूर- 5 अहमदनगर- 4 पालघर- 3 रायगड- 3 अमरावती- 3 नांदेड- 2 गोंदिया- 2 सिंधुदुर्ग- 2 नाशिक- 2 चंद्रपूर- 1 अकोला- 1 सांगली- 1 नंदुरबार- 1 औरंगाबाद- 1 बीड- 1 भंडारा- 1

  Corona Caller Tune चा वैताग आलाय? फक्त एका मेसेजने बंद करा तो आवाज

   राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
  बुधवारी 24 तासांमध्ये कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू (corona death cases) झाला आहे. तर नवी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या 105 इतकी होती. बुधवारी त्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Corona vaccination, Coronavirus, Maharashtra

  पुढील बातम्या