'कोरोना'ची धडकी! नगरमध्ये रुग्णालयातून 8 संशयित रुग्ण पळाले, 5 परतले; 3 पसार

जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षामध्ये या 8 ही जणांवर कोरोना व्हायरसचे संशयित म्हणून उपचार सुरू होते.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षामध्ये या 8 ही जणांवर कोरोना व्हायरसचे संशयित म्हणून उपचार सुरू होते.

  • Share this:
    अहमदनगर, 14 मार्च : राज्यभरात कोरोना व्हायरसमुळे बाधित रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे.  राज्यभरात खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आली आहे. परंतु, अहमदनगरमध्ये कोरोनामुळे निरीक्षणाखाली असलेले 3 रुग्ण पसार झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 8 जण हे दुबईला गेले होते. दुबईतून भारतात परतल्यानंतर 8 जणांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे नगरमधील जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षामध्ये या 8 ही जणांवर कोरोना व्हायरसचे संशयित म्हणून उपचार सुरू होते. परंतु, हे 8 ही रुग्ण पसार झाले होते. त्यापैकी 5 रुग्ण हे परत आले आहे. अजूनही 3 रुग्ण परत आलेले नाही. अचानक 3 रुग्ण पसार झाल्यामुळे रुग्णालयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांकडे धाव घेतली. रुग्णांच्या शोधासाठी तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी नावानुसार या रुग्णाचा शोध सुरू केला आहे. नागपुरात पळून गेलेल्या 4 रुग्णांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह दरम्यान, नागपूरमध्येही रुग्ण पळून गेल्याची घटना घडली होती. शुक्रवारी दुपारी मेयो रुग्णालयात चार जणांना दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णांची चाचणीही करण्यात आली होती. मात्र, चाचणीचे रिपोर्ट्स आले नव्हते. चारही जणांनी कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीनं रुग्णालयातून पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या 4 जणांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या होत्या. मात्र, रिपोर्ट्स न मिळाल्यानं हे चारही रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेले. या चारही रुग्णांचा युद्ध पातळीवर शोध सुरू केला होता.  आज या चारही रुग्णाचे रिपोर्ट्स समोर आले आहे. या चारही रुग्णांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. चारही रुग्णांविरोधात तक्रार दाखल परंतु, कोरोना  विषाणू संशयित 4 रूग्ण मेयो रुग्णालयातून  निघून गेले होते. या चौघांविरुद्ध विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार  मेयोच्या अधिष्ठाता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  कोरोना संदर्भात घरी विलगीकरण कक्ष तयार करून आरोग्य विभागाच्या सुचनेनेसार 14 दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. या सूचनांचे पालन करण्यात यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल. जनतेने उपचारासाठी सहकार्य करावे असं आवाहनही करण्यात आले आहे. ‘त्या’ दोन नागरिकांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे दरम्यान, यवतमाळमध्येही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहे.  येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नऊ नागरिकांपैकी दोन नागरिकांमध्ये कोरोना (कोव्हीड - 19) विषाणूची कमी तिव्रतेची लक्षणे आढळून आली आहेत. 1 मार्च रोजी विदेशातून नऊ नागरिक यवतमाळमध्ये दाखल झाले होते. शासनाकडून सुचना प्राप्त होताच त्यांना 12 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या सर्व नागरिकांचे नमुने नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले. यापैकी सात नागरिकांचे नमुने निगेटीव्ह तर दोन नागरिकांचे नमुने अल्प स्वरुपात पॉझिटिव्ह आले. हे नागरिक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम महसूल आणि आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्या लोकांपर्यंत पोहचून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना कॉरेंटाईन कक्षात ठेवण्यात येणार आहे.  नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    First published: