मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुम्ही मरा', 'कोरोना'ने घाबरलेल्या कैद्यांनी जेलमधून पत्र केलं व्हायरल

'तुम्ही मरा', 'कोरोना'ने घाबरलेल्या कैद्यांनी जेलमधून पत्र केलं व्हायरल

कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील कैद्यांनाही कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील कैद्यांनाही कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील कैद्यांनाही कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे.

कल्याण, 16 मार्च :  कोरोना व्हायरसमुळे राज्यभरात रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेच तर दुसरीकडे कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील कैद्यांनाही कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात कैद्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. प्रल्हाद पाटील नावाच्या कैद्याने हे पत्र लिहिली आहे.  या पत्रात लिहिलं आहे की, विशेष महानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांनी जेव्हा जेलमध्ये पाहणी केली. तेव्हा काही कैद्यांनी त्यांना कोरोना संदर्भात काय उपाययोजना केली याबाबत विचारणा केली. त्यावर जयस्वाल यांनी 'तुम्ही मरा' असं उत्तर दिल्याने कैद्यांनी अन्नत्याग त्याग आंदोलन सुरू केलं आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर जेल प्रशासनाकडे याबद्दल विचारणा केली असता, कैद्यांनी असं कोणतेही अन्नत्याग आंदोलन सुरू केलं नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत जेल प्रशासनाने जामिनासाठी कैद्यांनी कोरोनाची शक्कल लढवली आहे. अशा कोणत्याही प्रकारचा अन्नत्याग केला नाही, असं सांगितलं. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद, निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याची शिफारस महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायता निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही, अशी महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली. तसंच,  राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे.  उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील,  पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायती निवडणुका येऊ घातल्या आहे.  कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे - दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार - मुंबई बाग आंदोलकांची नोंद घेण्यात आली आहे त्यांना काऊन्सेलिंग करण्याची व्यवस्था करत आहोत - जनहितार्थ आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे - जिथे जिथे लोक गर्दी करत आहेत तिथे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत - मंत्रालयात आता सामान्यांना प्रवेश नाही -होम क्वारंटाईन 31 मार्चपर्यंत त्यांना हातावर शिक्के मारले जाणार - दुबई , सौदी अरेबिया आणि अमेरिका येथून येणाऱ्या प्रवाशांनी एबीसीमध्ये आयसोलेशन केलं जाणार - सर्व निवडणुका 3 महिना पुढे ढकलण्यात याव्या अशा निवडणूक आयोगाला सूचना - सर्व शाळा , कॉलेज आणि विद्यापीठांना परिक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना - प्रत्येक आयुक्तालयाला 15 कोटी आणि छोट्या आयुक्तालयांना 5 कोटी उपलब्ध करुन दिलेत
First published:

Tags: China, Japan

पुढील बातम्या