अहमदनगर13 मार्च : चीनसह इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसने थैमान घातलाय. मात्र कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअप व्हायरल झालेल्या अफवा याला कारणीभूत असल्याची आरोप केला जातोय. चिकन आणि अंडी खाल्यामुळे कोरोनाची लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायीकांवर झालाय अहमदनगर जिल्हात एका महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे.
कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय धोक्यात आलाय. राज्यात अनेक शेतकरी आज शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केलं आहे. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना सोशल मीडियाच्या चुकीच्या व्हायरल फेस्टमुळे पुन्हा अधिकच संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज घेऊन, शेड उभारले, पिल्ले वाढवली होती. मात्र कोरोनाची एक चुकीची पोस्ट व्हायरस झाली आणि शेतकऱ्याचं आयुष्य उद्धवस्त झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुक्यात 200 पेक्षा जास्त फार्म्स आहेत. त्यात एक कोटी बारा लाख पक्षी आहेत 70 रुपये असणारा भाव आज फक्त 7 रुपयांवर आलाय. यामुळे जिल्ह्यतल्या व्यवसिकांना एकाच महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे. एखाद्याची एक चूक अनेकांचं आयुष्य कसे उद्धवस्त करू शकते त्यामुळे कुठलीही पोष्ट व्हायरल करताना विचार करणे गरजेचं आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.
हे वाचा...
‘तमाशा’लाही बसला ‘कोरोना’चा फटका, बारी ठरवण्यासाठी गावपुढारी फिरकेना