मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात 'या' 8 ठिकाणी मिळणार कोरोना लस, 48 हजार डोस उपलब्ध

पुण्यात 'या' 8 ठिकाणी मिळणार कोरोना लस, 48 हजार डोस उपलब्ध

पुण्यातही आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे.

पुण्यातही आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे.

पुण्यातही आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे.

पुणे, 16 जानेवारी :जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर (corona vaccine) अखेर लस उपलब्ध झाली आहे. संपूर्ण देशभरात आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच आज लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, जालना, नागपूरसह इतर भागात लसीकरण केले जाणार आहे.

पुण्यातही आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी आठ केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडे कोविड लसीचे 48 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यातील 10 टक्के वेस्टेज वगळल्यावर अंदाजे 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोस मिळणार आहेत. याची तयारीही पूर्ण झाली आहे.

कोणकोणत्या रुग्णालयात होणार लसीकरण :

1) कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह

2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन

4) सुतार दवाखाना, कोथरूड

5) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा

6) रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता

7) नोबल हॉस्पिटल, हडपसर

8) भारती हॉस्पिटल, धनकवडी

तर नागपूर जिल्ह्यात बारा केंद्रांवर आज लसीकरण सुरू होणार आहे.  नागपूर शहरात पाच केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.  ग्रामीण भागातील सात तर शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पाचपावली येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

कोल्हापुरात कोविड योद्ध्यांसाठी रांगोळी

तर आज संपूर्ण देशभरात कोरोना बाबतच्या लसीकरणाला सुरुवात होतेय आणि कोल्हापूर जिल्ह्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. पण या निमित्ताने कोविड योध्यांना सलाम म्हणून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शिवाजी चौगुले यांनी तब्बल आठ तास वेळ खर्च करून जाड्या मिठाची अनोखी रांगोळी साकारली आहे. कोविड योध्यांना सलाम म्हणून ही रांगोळी साकारण्याच शिवाजी चौगुले यांनी सांगितले. 100 किलो जाडे मीठ आणि दहा किलो रांगोळी कलर वापरून त्यांनी ही रांगोळी तयार केली आहे.

First published:

Tags: Corona, Pune