Home /News /maharashtra /

ज्याला मेसेज येणार त्यालाच कोरोना लस मिळणार,आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

ज्याला मेसेज येणार त्यालाच कोरोना लस मिळणार,आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

कोरोना लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुंबई, 17 डिसेंबर: कोरोना संसर्गविरुद्धच्या लढाईत देशाला यश मिळताना दिसत आहे. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने हा दरही वाढला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणासाठी जोरदार पूर्व तयारी सुरू केली आहे. कोरोना लसीकरणासाठी सरकारनं मायक्रो प्लॅनिंग केलं असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्याला मेसेज येणार त्याला कोरोना लस देणार, असंही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. हेही वाचा...Corona Vaccine घेताच महिलेची तब्येत बिघडली; गंभीर लक्षणांमुळे चिंता वाढली आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना लस देण्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे. त्या व्यक्तीला मेसेज मिळेल. तो सेंटरवर येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. साधारण दोन कंपन्या सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लशीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केंद्रानं परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरू होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्य सरकार लसीकरण कार्यक्रमसाठी सज्ज आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील इतर आजार असलेले त्याचबरोबर 50 वर्षाखालील आजारी कर्मचाऱ्यांचा सगळा डेटा तयार करत आहोत. 18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्थाही पूर्ण करण्यात आली आहे. हेही वाचा...तुमच्या मोबाइलमध्ये कसं येणार मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची काय आहे योजना? उत्तर प्रदेशातील सर्व मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. पण आपल्याला तसं काही करायची गरज नाही. राज्यात मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तर सुट्टी रद्द होईल. जे काम राज्य सरकारला करायचं आहे, ते आम्ही करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या