मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना लस घेणे टाळले, औरंगाबादेत बाबा पेट्रोल पंप सील, प्रशासनाची धडक कारवाई

कोरोना लस घेणे टाळले, औरंगाबादेत बाबा पेट्रोल पंप सील, प्रशासनाची धडक कारवाई

कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे लोकांनी मास्क आणि लसीकरणाकडे (corona vaccination) दुर्लक्ष करत असल्याचं आढळून आलं आहे

कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे लोकांनी मास्क आणि लसीकरणाकडे (corona vaccination) दुर्लक्ष करत असल्याचं आढळून आलं आहे

कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे लोकांनी मास्क आणि लसीकरणाकडे (corona vaccination) दुर्लक्ष करत असल्याचं आढळून आलं आहे

औरंगाबाद, 21 नोव्हेंबर : कोरोनाची (corona vaccination) लाट ओसरल्यामुळे लोकांनी मास्क आणि लसीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळेच औरंगाबादमध्ये  no vaccination no petrol असं अभियान राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप ( Baba petrol pump aurangabad) सील करण्यात आले आहे. शहरातली ही पहिली कारवाई आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोरोना लसीकरण करणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे  पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रास्त भाव दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते.

WhatsApp कडून यूजर्सना मिळणार Surprise; App मध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या

या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः  सांयकाळी 8.30 वाजता बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा no vaccination no petrol या आदेशाचा भंग केल्याचे,  मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे अशा गोष्टी आढळल्यात.

Shocking Video! स्मोकिंग करताना चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत बाबा पेट्रोल पंप सील केले आहे.  या कारवाईमुळे शहरात दुकानदार आणि इतर पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहे.

First published:

Tags: Corona vaccination