मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चिंता वाढली! अहमदनगर बनले 'हॉटस्पॉट', प्रथमच एकाच दिवशी आढळले 6 कोरोना रुग्ण

चिंता वाढली! अहमदनगर बनले 'हॉटस्पॉट', प्रथमच एकाच दिवशी आढळले 6 कोरोना रुग्ण

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

अहमदनगरमध्ये एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याने, नगरकराणच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अहमदनगर, 14 मे: अहमदनगरमध्ये एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याने, नगरकराणच्या चिंतेत वाढ झाली आहे. नगर शहरामधील एकाच भागातील 6 रुग्ण सापडल्याने तो हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 60 वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत अहमदनगरमध्ये कोरोना रुग्ण कमी होते. मात्र, संगमनेर जामखेड नंतर आता नगरमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात खासगी दवाखाण्यातील एक परिचारिका असून दुसरा रुग्ण हा चालक असल्याने तो मुंबईला गेला होता. एक भाजी विक्रेती महिला आहे. ती गेल्या काही दिवसांपासून घरीच आहे. मग, त्यांना कोरोना कसा झाला, यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हाण उभं राहिलं आहे. हेही वाचा.. तिहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरलं! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्यात  1 हजार 495 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात 54 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 922 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, मुंबईत आज 800 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 15 हजार 747 वर पोहोचली आहे. हेही वाचा.. कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी ठरू शकते जीवघेणी, WHO ने केलं सावध राज्यातील कोरोनाबाधित एकूण मृतांची संख्या 975 वर पोहोचली आहे. आज झालेल्या 54 मृत्यूंपैकी मुंबईतील 40, पुण्यात 6, जळगाव 2,सोलापूर शहर 2, औरंगाबाद 2, वसई विरार आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष तर 21 महिला आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या