पुण्यातून कोरोनाची दु:खद बातमी, ससूनमध्ये आणखी दोघांचा मृत्यू

पुण्यातून कोरोनाची दु:खद बातमी, ससूनमध्ये आणखी दोघांचा मृत्यू

पुण्यात आज दिवसभरात नवीन 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आहे. तसंच राज्यातील मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. आज पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या दोन्ही कोरोनाबाधित पुरुष रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. एक 73 वर्षीय तर दुसरा रुग्ण हा 74 वर्षांचा होता. हे दोन्ही रुग्ण  भवानी पेठेतील कासेवाडी  झोपडपट्टीत राहणारे होते. या दोन्ही रुग्णांवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांच्या मृत्यूमुळे पुण्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा हा 39 वर पोहोचला आहे.

हेही वाचा - मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

तर दुसरीकडे पुण्यात आज दिवसभरात नवीन 44 कोरोना  पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 366 वर पोहोचली आहे.

पुण्यातील  28 परिसर होणार सील  

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये कठोर पावलं उचलली जाणार आहेत. पुण्यातील 16 पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आणखी 28 परिसर हे सील करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - मैत्रीचे बंध! मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण

पुण्यात या आधीच 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले होते. आता आणखी 28 परिसर सील करण्यात येणार असल्यामुळे लॉकडाउन आणखी कडक होणार आहे. सोमवारी महापालिका आयुक्तांनी पुण्यातील काही परिसर सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे दिला होता.

मात्र, महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये आणखी काही परिसरांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार, बुधवारपासून हे परिसर सील करण्यात येणार आहे. या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 15, 2020, 4:31 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या