'पक्ष वाढवा, कोरोना नाही'; मुख्यमंत्री उद्भव ठाकरेंची राजकारण्यांनाही तंबी

'पक्ष वाढवा, कोरोना नाही'; मुख्यमंत्री उद्भव ठाकरेंची राजकारण्यांनाही तंबी

आपण एकत्र राहिलो नाही तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. मुंबई, पुण्यानंतर आता विदर्भातही कोरोनानं कहर केला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोना नियम पाळले जात नसल्यानं सरकारची डोकेदुखी वाढली आहे आणि यासाठी फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही, तर राजकारणीदेखील जबाबदार आहेत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकारण्यांनादेखील तंबी दिली आहे.

राज्यातील कोरोना वाढीला सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणाही जबाबदार आहेत, याकडे राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्याला राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतलं आहे.  पक्ष वाढवा, कोरोना नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व पक्षांना खडसावलं आहे.

हे वाचा - लॉकडाऊन होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सविस्तरपणे सांगितली भूमिका

उद्धव ठाकरे म्हणाले, "नाईलाजानं निर्बंध टाकण्याची वेळ आली आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर लॉकडाऊन करावा लागेल.  पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, पण कोरोना नाही.  त्यामुळे राजकीय पक्षांनीही नियम पाळावेत. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन काही दिवस टाळा. लवकरच शासकीय कार्यक्रम झूमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे"

लॉकडाऊनसाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

लॉकडाऊन लागणार की नाही हे तुमच्या हातात आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. "लोक आता मास्क घालत नाहीत. पहिली सॅनिटायझरची बाटली प्रत्येकाकडे असायची आता नाही. त्यामुळे आता आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी राबवली आता मी जबाबदार ही मोहीम राबवायची आहे. मी जबाबदार म्हणजे  मी मास्क घालणार, हात धुणार, सॅनिटाझर वापरणार"

हे वाचा - पुणेरी कोरोना लशीसाठी देशांच्या रांगा; अदार पूनावालांनी घेतला मोठा निर्णय

"तुम्हाला मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन करावंच लागेल. पुढील आठ दिवस हे सर्व पाहिलं जाईल. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला लॉकडाऊन नको आणि नियमांचं पालन केलं नाही तर याचा अर्थ तुम्हाला लॉकडाऊन हवा", असा अल्टीमेटम उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: February 21, 2021, 8:43 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या