मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तिसऱ्या लाटेची चाहुल? सोलापुरात 600 बालकांमध्ये आढळली कोरोना सदृष लक्षणं, पण...

तिसऱ्या लाटेची चाहुल? सोलापुरात 600 बालकांमध्ये आढळली कोरोना सदृष लक्षणं, पण...

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

या अभियानांतर्गत जवळपास 5 लाख पन्नास हजारहून अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

सोलापूर, 30 जुलै : राज्यात कोरोनाची ( maharashtra corona case) लाट ओसरल्यामुळे निर्बंध आणखी शिथिल करावी अशी मागणी केली जात आहे. पण, कोरोनाची तिसऱ्या लाटेची (Corona third wave) भीतीही वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाट लहान मुलांवर प्रभावी ठरणार अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली होती. आता सोलापूर जिल्ह्यातील 600 बालकांना कोरोना सदृष लक्षणे (corona Sysmptoms) आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी ती निवळली नसल्याचे पाहायला मिळतेय. त्यातच सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना पुर्णपणे हद्दपार झालेला नाही. त्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध अभियान राबविले जात आहेत. त्यातच मागील दोन महिन्यांपासून लहान मुलांचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने 'माझे मूल माझी जबाबदारी' हे अभियान राबविले जात आहे.

दुकानावर डल्ला मारला पण गल्ला रिकामाच; निराश चोरट्यांनी काजू बदामावर मारला ताव

या अभियानांतर्गत जवळपास 5 लाख पन्नास हजारहून अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मागील दोन महिन्यात 600 हून अधिक मुलांमध्ये कोरोनासदृष लक्षणे आढळली आहेत. मात्र ते पॉझिटीव्ह नाहीत. तसंच त्यातील 560 हून अधिक मुले बरी झाली आहेत. तर 65 मुले कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आलेत. मात्र असे असले तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी कोणत्याही पद्धतीने घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी केले आहे.

कोरोनाने रूप बदलल्यावर लक्षणंही बदलली

दरम्यान, कोरोनाची लस न घेतलेले, (not vaccinated) लसीचा पहिला डोस घेतलेले (Single vaccine) आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेले.  या तिन्ही प्रकारच्या नागरिकांमध्ये कोरोनाची वेगवेगळी लक्षणं आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

पुन्हा मास्कसक्ती! निम्म्या देशाने लस घेऊनही अमेरिकेत 24 तासांत लाखभर रुग्ण

युकेतील हेल्थ सायन्स कंपनी ZOE नं 40 लाख नागरिकांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. कोरोनाची लक्षणं दर काही महिन्यांनी बदलत असल्याचंही त्यातून दिसून आलं आहे. कोरोनाचं आगमन झालं त्या काळात केवळ ताप आणि कोरडा खोकला होत होता. त्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी सुरु झाली. काही दिवसांनी वास जाणे, चव जाणे याचे अनुभव नागरिकांना येऊ लागले. त्यानंतरच्या काळात असह्य डोकेदुखी आणि शरीरातील इतर अवयवांवर कोरोना विषाणू परिणाम करत असल्याचं दिसून आलं. आता लसीकरणाच्या अवस्थेनुसार वर्गीकरण केलं असता, प्रत्येक वर्गात वेगवेगळी लक्षणं दिसून येत असल्याचं सिद्ध झालं आहे.

First published:
top videos