Home /News /maharashtra /

पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पालिकेनं घेतला मोठा निर्णय

पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पालिकेनं घेतला मोठा निर्णय

कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.2 आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 37 टक्के आहे.

कल्याण, 30 मे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाळ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढेल अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे केडीएमसीकडून पावसाळ्याच्या तोंडावर कंबर कसली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून    कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे होणाऱ्या  मृत्यूचा दर 2.2 आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 37 टक्के आहे.  कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करा अशी मागणी करण्यात आली होती. केडीएमसी आयुक्तांनी जून महिन्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करणार आहोत, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली. यापूर्वी सुद्धा कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावा यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा मनसे आमदार यांनी केला होता. हेही वाचा-केईएममध्ये 'हाय-फ्लो-नेझल कॅनूला'चा तुटवडा, विरोधी पक्ष नेत्यानं घेतला हा निर्णय कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत काय उपाययोजना केल्या आहेत. याचा आढावा महापौर यांनी घेतला. यावेळी माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी उपरोक्त माहिती दिली. आयुक्तांनी सांगितले की, 8 एप्रिलपासून महापालिका हद्दीतील एकाही कोरोना रुग्णाला मुंबईत उपचारासाठी पाठविलेले नाही. रुग्णांकडून टेस्ट आणि उपचाराचा खर्च घेतला जात नाही. महात्मा फुले आरोग्य योजनेतून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मेट्रोपोलिस लॅबने महापलिका हद्दीतील 10 हजार रुग्णांची कोविड चाचणी मोफत करुन देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेची शिफारस आवश्यक असणार आहे. हेही वाचा-टायगरनं वेगवान कारसमोर केला स्टंट, 14 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO याशिवाय काही रुग्णांना खाजगी रुग्णालयातून उपचार करुन घ्यायचे असल्यास त्यांना खाजगी रुग्णालयाने केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरप्रमाणेच उपचार करावे लागतील. त्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये तसेच दर पत्रकाचे फलक लावले जाणार आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याआधीच तो संशयित असताना त्याला उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली जाईल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात पाठविता येईल. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी आल्यास रुग्णालयाने त्याचा अहवाल महापालिकेच्या हेल्थ पोस्टला एका दिवसाच्या आत पाठवणे सक्तीचे करण्यात आले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Kalyan, KDMC, कल्याण, डोंबिवली

पुढील बातम्या