मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोकणवासियांना मोठा दिलासा; 2 जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणीला सुरुवात, 1 तासात मिळणार रिपोर्ट

कोकणवासियांना मोठा दिलासा; 2 जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणीला सुरुवात, 1 तासात मिळणार रिपोर्ट

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.

रत्नागिरी, 9 जून : रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन आज झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. 'ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करत आहे,' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रयोग शाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.

तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्हयांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी 80 लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी 15 लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पध्दतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.

दुसरीकडे, सिंधुदुर्गातही जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनव्दारे कोवीड-19 ची तपासणी सुरु झाली आहे.आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यककीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी.एम. मोरे व तंत्रज्ञ श्री. परब यांच्या उपस्थितीत यंत्र सामुग्रीची पाहणी केली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आय.सी.एम.आर) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सद्या ट्रुनॅट एक मशीन व सिबी नॅट कोवीड – 19 एक, अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत. या दोन्ही मशिनव्दारे एका तासात दोन तपासणी होवू शकतात. ट्रुनॅट मशीनव्दारे स्वॅब तपासल्यानंतर याची स्क्रिनींग टेस्ट होऊन निगेटीव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो.

संपादन - अक्षय शितोळे

First published:
top videos

    Tags: Coronavirus