• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोनाच्या संशयित रुग्णांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

कोरोनाच्या संशयित रुग्णांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

परदेशातून प्रवास करून दोन महिला भिवंडी शहरात आल्या असल्याचा व्हिडीओ शनिवारी शहरभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली.

  • Share this:
भिवंडी, 21 मार्च: परदेशातून प्रवास करून दोन महिला भिवंडी शहरात आल्या असल्याचा व्हिडीओ शनिवारी शहरभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली. शहरातील अंजुरफाटा परिसरात राहणाऱ्या या महिला परदेशी प्रवास करून येताना मुंबई विमानतळावर त्यांची रीतसर तपासणी होऊन त्यांना प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून त्यांनी चौदा दिवस होम क्वारंटाईन करून राहावे, असे सांगत त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आले. ही माहिती भिवंडी शहरात पसरताच नारपोली पोलीस व महानगरपालिका आरोग्य विभागाचे पथक त्यांच्या घरी दाखल होत त्यांना तुला बाबतच्या घ्यावयाच्या काळजी बाबत समाजविण्यात आले . हेही वाचा..परराज्यातल्या बसेसना महाराष्ट्रात बंदी, राज्यातल्या बसही सीमा ओलांडणार नाहीत परंतु या वेळी काहींनी त्या बाबतचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच , व्हायरल व्हिडीओ मुळे महिलांना नाहक मनस्ताप होऊन त्यांच्यात नैराश्य पसरले होते .ही माहिती समजताच स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी त्या परिसरास भेट देत नागरीकांनी घाबरून न जाता ,होम कोरंटाईन झालेल्या महिलांना मोबाईल वर संपर्क साधता धीर देत असतानाच नारपोली पोलिसांकडे सदरचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे . हेही वाचा...प्राध्यापकाची नोकरी सोडून विकायला लागला मासे, महिन्याची कमाई थक्क करणारी दरम्यान भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ जयवंत धुळे यांनी शहरात परदेशी प्रवास करू न आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती महानगरपालिका आरोग्य विभाग घेत असून अशा व्यक्तींना होम कोरंटाईन होण्याचा सल्ला दिला असून ,व्हायरल व्हिडिओ वर प्रसारित वृत्त खोटे असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून माजी उपमहापौर,  नगरसेवक मनोज काटेकर यांनी जाहीर केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे रेडलाईट एरियाही बंद दरम्यान,  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, दुकाने, मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शासकीय कार्यालयातही 50 टक्के कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारभार सुरु आहे. दुसरीकडे, भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट एरियामधील 300 हून अधिक वारांगणांनी येत्या रविवारपर्यंत देहविक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीसाठी या परिसरात बंदी घातलण्यात आली आहे. चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सरकारने विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्यातील अनेक समाजसेवी संस्थाही सरसावल्या आहेत. यात हातभार लावण्यासाठी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट परिसरातील देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 300 हून अधिक महिला पुढे आल्या आहेत. या महिलांनीही कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: