धक्कादायक, कोरोना संशयित रुग्ण आणि सामान्य रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार!

धक्कादायक, कोरोना संशयित रुग्ण आणि सामान्य रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार!

या सगळया प्रकारामुळे इतर रुग्ण,डॉक्टर ,नर्स,आणि इतर कर्मचारी बाधित होण्याची शक्यता वाढली आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 15 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नसल्याचे प्रकार समोर येत आहे. उल्हासनगरमध्ये (ullhasngar) तर सामान्य रुग्णांसोबत कोरोना संशयित रुग्णांवर एकत्र उपचार करण्याची वेळ इथल्या डॉक्टरांवर आली आहे. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात (Government Central Hospital) हा प्रकार सुरू आहे.

उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे कोविड रुग्णालय नाही. मात्र इथे कोरोनाची लक्षणं असलेली अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. संशयित रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल यायला चार दिवसांपेक्षा जास्त दिवस लागत आहेत.

दुर्दैवी..! एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

परिणामी सामान्य रुग्णांच्या वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यावाचून डॉक्टरांना पर्याय नाही. शिवाय अहवाल पॉझिटिव्ह आल्याशिवाय कोरोनासाठी असलेल्या रूग्णालयात या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.

सध्या असे अनेक कोरोना सदृद्य रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी फिरत आहेत. या सगळया प्रकारामुळे इतर रुग्ण,डॉक्टर ,नर्स,आणि इतर कर्मचारी बाधित होण्याची शक्यता वाढली आहे.

IPL 2021: विराट कोहलीला आदळाआपट भोवली! मॅच रेफ्रींनी घेतली गंभीर दखल

उल्हासनगर शहरात सध्या महापालिकेचे एकमेव कोविड रुग्णालय असून त्याची बेड क्षमता संपल्याने नागरिकांनी जायाचे कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. तर काही तांत्रिक अडचण असल्याने कोरोना चाचणी अहवाल उशिरा येत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 5:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या