कोरोना संशयित व्यक्ती कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता, 22 किमी दूर अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट

कोरोना संशयित व्यक्ती कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता, 22 किमी दूर अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट

सदर वृद्धाची सून कोरोना बाधित आल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Share this:

जळगाव, 14 जुलै : कोरोनाची लक्षण असलेला संशयित 60 वर्षीय व्यक्ती अमळनेर येथील कोव्हिड केअर सेंटरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या वृद्धाचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोव्हिड सेंटरपासून 22 किलोमीटर लांब असलेल्या पारोळा तालुक्यातील विचखेडा येथे महामार्ग क्रमांक सहा येथे वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर वृद्धाची सून कोरोना बाधित आल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क संपर्कात आल्याने हे पाऊल उचण्यात आलं होतं. मात्र स्वॅब घेण्याआधीच हा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाला. त्यामुळे कोव्हिड केअऱ सेंटरमध्ये खळबळ उडाली.

दोन दिवस संशयित रुग्ण आढळून न आल्याने कोव्हिड सेंटरमधील डॉक्टरांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. कोव्हिड रुग्णालयातील डॉ. काळे यांनी केलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. मात्र आता या वृद्धाचं अपघाती निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं

दरम्यान, सदर वृद्ध व्यक्ती कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण याआधी कोरोनाच्या भीतीमुळे काही रुग्णांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपासानंतर नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 14, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading