औरंगाबाद, 28 नोव्हेंबर : कोरोनाची लाट (Corona Virus) ओसरली असतानाच नवी कोरोना व्हेरिएंटने Omicron Variant) डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात कोरोनाची नवीन नियमावलीच जाहीर करण्यात आली असून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण, दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यासहच नेत्यांना चक्क मास्कचा विसर पडल्याचं समोर आलं आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने औरंगाबादमध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते. पण, यावेळी राजेश टोपे यांच्यासह अधिकारी आणि नेत्यांनाच मास्कचा विसर पडला.
अंपायरनंतर न्यूझीलंडच्या यंगचीही मोठी चूक, रहाणे म्हणाला 'हो गया हो गया'! VIDEO
कार्यक्रमाला उपस्थितीत असलेले मंत्री आणि नेते मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. एवढंच नाहीतर सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने शनिवारीच कोरोनाची नवीन नियमावली प्रसिद्ध केली असून मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे असे नियम बंधनकारक करण्यात आले आहे. पण, दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते मात्र बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे.
वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह 5 मंत्र्यांना आणि एका आमदारांना मास्कचा विसर पडला आहे. या कार्यक्रमाला
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, संदीपान भुमरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली झाल्याचे समोर आले आहे.
मास्क न लावणाऱ्याना सर्वसामान्यांना 500 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता मंत्र्यांना आणि आमदारांनाही दंड ठोठवला जाईल का, असा सवाल उपस्थितीत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajesh tope