नाशिक, 29 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेवरून (south africa) मुंबईत एक हजाराहून जास्त प्रवाशी आले आहे. तर नाशिकमध्येही दोन जण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचे समोर आले आहे. पण, त्या दोन्ही तरुणांची चाचणी ही निगेटिव्ह (Corona report negative) आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा श्वास सोडला.
काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये आयर्न मॅन स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेसाठी नाशिक शहरातील दोन स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला गेले होते. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर दोघेही जण नाशिकला परत आले होते. त्यानंतर नाशिककरांनी या दोन्ही तरुणांची विजयी मिरवणूक काढली होती.
पण, जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळला अशी माहिती समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून जे जे प्रवाशी आले आहे, त्यांची चाचणी घेतली जात आहे. या दोन्ही स्पर्धकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. तसंच त्यांच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेण्यात आले होते. आज उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त झाले असता सर्वांचं रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा श्वास सोडला.
विशेष म्हणजे, या दोन्ही तरुणांची विजयी मिरवणूक काढली होती, त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले होते. पण, आता रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
मोठी बातमी! Twitter च्या CEO पदावर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल
दरम्यान, खबरदारी म्हणून शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय देखील १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत आदेश जारी केला आहे. पण कोरोनाचे नवीन संकट समोर येऊन ठेपल्यामुळे आता नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला आहे. तशी सूचना नाशिक महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.