रत्नागिरीत आलेल्या एका व्यक्तीमध्ये आढळली कोरोना संबंधित लक्षणे, रुग्णालयात दाखल

रत्नागिरीत आलेल्या एका व्यक्तीमध्ये आढळली कोरोना संबंधित लक्षणे, रुग्णालयात दाखल

कोरोना संबंधित लक्षण आढळून आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

  • Share this:

रत्नागिरी, 17 मार्च : दुबईतून रत्नागिरीतील एका गावात आलेल्या युवकाला अचानक सर्दी, ताप आणि खोकला सुरू झाला. त्यामुळे या रुग्णाला थेट रत्नागिरी सिव्हिलला हलवलं आहे. दुबईत असल्यापासून त्याला गेली 15 दिवस हा त्रास सुरू आहे अशी माहिती मिळाली आहे. कोरोना संबंधित लक्षण आढळून आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्य हादरून गेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी मंगळवारी जाहीर केलं आहे.

दुसरीकडे,पुण्यात पुढील तीन दिवस व्यापार बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी हा निर्णय असणार आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात असा शिरला Coronavirus! तेव्हाची एक चूक पडली महाग

पुण्यात याआधीच पुढचे 3 दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.

First published: March 17, 2020, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading