Home /News /maharashtra /

शिवसेना भवनानंतर मातोश्रीजवळही आला कोरोना; पालिकेनं सील केला शेजारचा बंगला

शिवसेना भवनानंतर मातोश्रीजवळही आला कोरोना; पालिकेनं सील केला शेजारचा बंगला

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी कोरोनाबाधित आढळल्याने अधिक काळजी घेतली जात आहे

    मुंबई, 24 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राहत असलेल्या मातोश्री या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या बंगल्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील बांद्रा येथे कलानगर परिसरात उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला संपूर्ण राज्याला परिचित आहेच. त्याच बंगल्याच्या बाजूला असलेल्या बंगला नंबर 26 मध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. उद्धव ठाकरे यांचे शेजारी अंधेरीच्या रुग्णालयात उपचार घेत होते, त्यातच ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पुढील 2 दिवस निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन बंद राहणार आहे. मातोश्री शेजारचा हा बंगला आता महापालिकेने सील केला आहे. राज्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याच ठिकाणी राहत असल्याने, या परिसरात आता पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचीच सत्ता असल्य़ाने महापालिकेकडूनही सर्व खबरदरीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मलबार हिल परिसरातील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी न जाता मातोश्री येथेच राहण्यास पसंती दिली. मात्र महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका या वर्षा या निवासस्थानी होत असल्या तरी मातोश्री हे राजकीयदृष्ट्या सध्या राज्याचे केंद्रबिंदू आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही दिवस मुख्यमंत्र्यांनी मातोश्री या निवासस्थानातूनच राज्याचा कारभार पाहिला होता. मध्यंतरीच्या काळात कलानगर परिसरात एका चहावाल्याला, काही पोलिसांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर, या भागात अधिक काळजी घेण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वर्षा या मलबार हिल परिसरातही काही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री राहत असलेला परिसरातही कोरोनाबाधित आढळल्याने आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात विशेष प्रयत्न महापालिका आणि सरकारकडून करण्यात येणार आहेत.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    First published:

    Tags: Udhav thackarey

    पुढील बातम्या