• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भयंकर! यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयात जागाच मिळेना, रुग्ण हॉस्पिटलबाहेर झोपून

भयंकर! यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयात जागाच मिळेना, रुग्ण हॉस्पिटलबाहेर झोपून

यवतमाळच्या (Yavatmal) शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाची परिस्थिती भयंकर आहे. शासकीय रुग्णालय पूर्ण भरलं आहे. यामुळे, कोरोना (Corona) रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठीही बेड उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.

  • Share this:
यवतमाळ 13 एप्रिल : राज्यातील कोरोना स्थिती (Corona Cases in Maharashtra) अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात टाकावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिन बे़डची (Oxygen Bed) कमी, व्हेंटिलेटरची कमी तर काही ठिकाणी रुग्णालयात जागाच नसल्यानं अनेक रुग्ण रुग्णालयाबाहेर तीन- चार दिवस बेडसाठी वाट पाहात आहेत. अशीच परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळच्या (Yavatmal) शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाची परिस्थिती भयंकर आहे. जिल्ह्याच्या बाहेर असणारं शासकीय रुग्णालय पूर्ण भरलं आहे. यामुळे, रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठीही बेड उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. रुग्णांना बेडच्या प्रतीक्षेत अक्षरशः ओपीडीबाहेर झोपून राहावं लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्सिजनची गरज असणारे अनेक रुग्णही बाहेर बेंचवर बसून आहेत. खुर्चीवरच या रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात आहे. ऑक्सिनजअभावी मृत्यू? नालासोपाऱ्यात एकाच दिवसात 12 Corona रुग्ण दगावले एका रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी साधारण दोन ते तीस तास वेळ लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकराचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. राज्यात सोमवारी आढळलेले कोरोना रुग्ण - सोमवारी राज्यात 51,751 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 258 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.68 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,23,22,393 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,56,996 (14.49 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 32,75,224 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,399 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Published by:Kiran Pharate
First published: