• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी

कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी

रांजणोली येथील आमंत्रण क्वारंटाइन सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एकानं उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

  • Share this:
भिंवडी, 19 जुलै: भिवंडीतील रांजणोली येथील आमंत्रण क्वारंटाइन सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एकानं उडी घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत आंबेकर (वय-40) असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. कोरोनाच्या भीतीनं प्रशांत आंबेकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आमंत्रण क्वारंटाइन सेंटरमध्ये भिवंडीसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेंतर्गत येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. हेही वाचा..काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांची राम मंदिर भूमीपूजनावर टीका मृत प्रशांत आंबेकर हे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवासी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आंबेकर यांच्यात कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यामुळे त्यांनी आमंत्रण क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होत. मात्र, प्रशांत यांनी 5 व्या मजल्यावरील खिडकीतून थेट खाली उडी घेतली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशांत आंबेकर यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे,  लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. भिंवडी शहरात देखील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीत 31 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हेही वाचा... Lockdownमुळे मोडलं किराना दुकानदारांच कंबरडं, 100 दिवसांत 15 लाख कोटींचं नुकसान भिवंडीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्याची निर्णय भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ.  पंकज आशिया यांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्व बंद राहतील, असं देखील आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: