नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

नाशिक महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

Nashik Corona Update : कोविड (Covid Hospital ) रुग्णालयात बेड न मिळाल्यानं ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनं या रुग्णासोबत पालिकेत धाव घेतली त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

नाशिक, 01 एप्रिल : रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये (nashik municipal corporation) ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या रुग्णाला पालिकेत घेऊन येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिडको भागात राहणाऱ्या एका रुग्णाला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र प्रकृती खालावली असूनही त्यांना बेड मिळत नव्हता. लोकप्रतिनिधींही त्यांना बेड मिळावा यासाठी खासगी रुग्णालयांना विनंती केली मात्र त्यांनाही दाद मिळेना. अखेर रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने रुग्णाला घेऊन थेट महापालिकेचं राजीव गांधी भवन प्रवेशद्वार गाठलं. त्यानंतर खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने त्यांना नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मोठी घोषणा; 45साठी संपूर्ण एप्रिल महिना लसीकरणाचा, सुट्ट्याही रद्द

परंतु, आज उपचारादरम्यान, या रुग्णाचा मृत्यू झाला. प्रकृती ठीक नसतानाही आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या सामजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री कीर्ती कुल्हारी नवऱ्यापासून विभक्त; स्वतःच पोस्ट करत सांगितलं कारण

पालिकेच्या कोविड रुग्णालयात बेड न मिळाल्यानं ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनं या रुग्णासोबत पालिकेत धाव घेतली त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक डोके स्वतःला सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी नाशिकमधील कोरोनाची भयावह परिस्थिती या घटनेतून समोर आली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 1, 2021, 3:32 PM IST

ताज्या बातम्या