कोरोना रुग्णाने हॉस्पिटलची खिडकी फोडली, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या

कोरोना रुग्णाने हॉस्पिटलची खिडकी फोडली, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत केली आत्महत्या

गंभीर जखमी झालेल्या या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 25 ऑगस्ट : अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. सर्वसामान्यांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यातच एका रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आज तोफखाना पोलिसांनी दिली.

आत्महत्या केलेला 32 वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading