मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावतीत कोरोनाचा उद्रेक, गेल्या 24 तासात 802 पॉझिटिव्ह तर 10 लोकांचा मृत्यू

अमरावतीत कोरोनाचा उद्रेक, गेल्या 24 तासात 802 पॉझिटिव्ह तर 10 लोकांचा मृत्यू

आजपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

आजपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

आजपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

अमरावती, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रापुढे (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) संकट येऊ ठेपले आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. बुधवारी दिवसभरात 802 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे तर सर्वाधिक दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृतांची संख्या 481 वर पोचलेली आहे. बुधवारी जिल्ह्यात 231165 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 802 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रुग्णाचा दर हा 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मागील 24 तासात 802 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.  एकाच दिवसात 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

खबरदारीचे उपाय म्हणून संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. सुपर स्पेडरच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहे. आजपासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल पंपावरून पेट्रोल मिळणार आहे.

दरम्यान, अमरावती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमरावती शहरासह अन्य दोन ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली होती. सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू साठी लोकांना मुभा दिली होती. मात्र, लोकांनी जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून पूर्णपणे लॉकडाउनचा फज्जा उडवला आहे. अनेक लोकं रस्त्यावर उतरत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढू शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Corona hotspot, Covid-19 positive, Covid19, Lockdown, Maharashtra, Mumbai