रत्नागिरी, 11 मे: खेड तालुक्यातील (Khed Tehsil) लोटे एमआयडीसी (Lote MIDC)मधील लवेल येथील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत काम सुरु असलेल्या रोलिंग स्टोक कंपोनेन्ट्स फॅक्ट्रीमधील तब्ब्ल 40 कामगारांना कोरोना (40 employees covid positive) झाला आहे. एकाच कंपनीतील 40 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या सर्व कामगारांना कंपनीच्याच कॉलनीमध्ये अलगीकरण करून ठेवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजन शेळके यांनी दिली आहे.
लोटे एमआयडीसी परिसरात खेड, दापोली, मंडणगड आणि चिपळूण या तीन तालुक्यातील हजारो कामगार काम करतात. गेल्यावर्षी पहिल्या लाटेत देखील लोटे परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट ठरला होता. यावर्षी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कंपन्यांना आपल्या कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. अनेक कंपन्यांनी शासनाच्या सूचनेनुसार चाचण्या केल्या मात्र अनेक कंपन्यांनी अजूनही कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणीला सुरवात केली नसल्याचे दिसून येत आहे.
वाचा: Mucormycosis चे कल्याण-डोंबिवलीत दोन बळी; सहा रुग्णांवर उपचार सुरू
आज लोटे एमआयडीसीमधील अतिरिक्त भूसंपादनातील लवेल येथील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा सर्वात मोठा रोलिंग स्टोक कंपोनेन्ट्स फॅक्ट्री ही रेल्वेचे सुटते भाग तयार करण्याच्या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी शेकडो कामगार त्या ठिकाणी काम करतायत आणि आज त्या कामगारांपैकी 40 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट आल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शेळके, नोडल ऑफिसर डॉ चेतन कदम यांनी आपल्या पथकासह त्या ठिकाणी धाव घेऊन सर्वांची तपासणी केली.
कंपनीच्या ठेकेदाराने देखील खासगी डॉक्टरची नियुक्ती केली आहे असे सांगण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी कंपनीच्या परिसरात असणाऱ्या कॉलनीमध्ये अलगीकरण करून ठेवले असून त्यांची आरोग्य तपासणी दररोज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत एका लोटे एमआयडीसी परिसरात 400 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून खेड तालुक्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडण्याचे ठिकाणी लोटे परिसर झाले आहे. या कंपनीत शेकडो कामगार काम करत असून सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Ratnagiri