मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

72 वर्षाच्या आजीपासून 12 वर्षांच्या मुलापर्यंत, 300 पोलिसांना जेवण देण्यासाठी कुटुंब सेवेत गुंतलं

72 वर्षाच्या आजीपासून 12 वर्षांच्या मुलापर्यंत, 300 पोलिसांना जेवण देण्यासाठी कुटुंब सेवेत गुंतलं

बीड शहरातील जगताप कुटुंब गेल्या 20 दिवसांपासून बीड शहरातील 300 पोलिसांना दोन वेळाचे रुचकर जेवण तयार करून डब्बे पोहोचवत आहे.

बीड शहरातील जगताप कुटुंब गेल्या 20 दिवसांपासून बीड शहरातील 300 पोलिसांना दोन वेळाचे रुचकर जेवण तयार करून डब्बे पोहोचवत आहे.

बीड शहरातील जगताप कुटुंब गेल्या 20 दिवसांपासून बीड शहरातील 300 पोलिसांना दोन वेळाचे रुचकर जेवण तयार करून डब्बे पोहोचवत आहे.

बीड, 14 एप्रिल : बीड शहरात चौका-चौकांमध्ये बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना जेवणासंदर्भात विचारला असता 'दादाचा' डबा येतो असं सांगतात. जेवण रुचकर असतं, घरगुती जेवणासारखं. तेल चटणी,लोणचं, पापड यासह दोन वेळा डब्बा येतो. त्यातही रोज वेगळे पदार्थ असतात. त्यामुळे आम्हाला अडचण येत नाही, काम संपलं तरी घरी सुद्धा जात नाही. कारण लहान मुले असल्यामुळे आम्ही स्वतःला कॉरन्टाइन करून घेतो, असं सांगताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळे पानावतात. दादाच्या डब्याची चव मात्र न्यारी, असं सांगायला ते विसरत नाहीत. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांकडून एवढं कौतुक ऐकल्यानंतर मग दादाचा डब्बा बनवला जातो कुठे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा शोध सुरू झाला. तेव्हा माहिती मिळाली की बीड शहरातील जगताप कुटुंब गेल्या 20 दिवसांपासून बीड शहरातील 300 पोलिसांना दोन वेळाचे रुचकर जेवण तयार करून डब्बे पोहोचवतं. मुंबईमधील डबेवाल्यांच्या कामाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता बीडमधील "दादाच्या" डब्याची चर्चा आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर 24 तास कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या व सुरक्षेची खबरदारी घेणाऱ्या बीड शहरातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी रोज दोन टाईम जेवणाचा डब्बा देणारे जगताप कुटुंब खरंच लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या घरातील प्रत्येकजण यासाठी मेहनत घेत आहे. 72 वर्षीय आज्जी पासून ते 12 वर्षाच्या मुलापर्यंत सगळेच घरातून हातभार लावत आहेत. अनिल(दादा )जगताप,किशोर जगताप,विजय जगताप या तिघा भावांनी डब्बे पाठवण्याचे ठरवले. सुरुवातीला फक्त 80 डब्याचा स्वयंपाक केला जायचा. मात्र आता 300 पेक्षाही जास्त डब्बे पोलीस बांधवाना पुरवले जात आहेत. या कामात आज्जी निलावती बाईंच्या तिन्ही सुना मदत करत आहेत. विशेष म्हणजे येथे दररोज रुचकर जेवण देताना उद्या काय पौष्टिक जेवण द्यायचे यावर संपूर्ण कुटुंब एकत्रित बसून विचारमंथन करतं आणि मगच निर्णय घेतला जातो. यासाठी विजय जगताप स्वतः भाजी बनवतात. चपाती, पोळी भाजण्यापासून चटणी लोणचं भरून डब्बे देईपर्यंत सगळे लक्ष देतात,.त्यात काही शेजाऱ्यांची देखील मदत होते. दोन भाजा, पाच चपाती, भात, कधी मसाला भात, डाळ खिचडी, स्वीट, त्यासोबत कांदाही दिला जातो. असा संपूर्ण आहार असलेला डब्बा पोचविण्यासाठी मग धावपळ सुरू होते. प्रत्येकाला डबा पोचवणे, जेवण झाल्यावर पुन्हा घेऊन येणे, स्वच्छ धुणे, आदी सर्व करण्यासाठी तरुण मित्रांनी सहकार्य केले, दादाचा डब्बा नाव कसे पडले? अनिल जगताप हे माजी शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. सामाजिक कामामुळे त्यांना अनिल दादा असे सर्वजण म्हणतात. कोणाकडून डब्बा आला तर दादांनी पाठवला, असं म्हटलं जातं. त्यामुळे दादाचा डबा अशी ओळख झाली. आज वर्दीतील देवदुतांसाठी दादाचा रुचकर डब्बाहा महत्वाचा ठरत आहे. पोलिसांना पोटभर जेवण देण्याची संकल्पना तशी अनिल दादा च्या मातोश्री निलावतीबाई यांची. यात तीन भाऊ स्वतः हे डब्बे पोलिसांना पोहोच करतात. या संदर्भात अनिल जगतात यांना विचारलं असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कोरोना सारख्या जीवघेण्या संकटात आपण काय करू शकतो? तर जी माणसं अहोरात्र सेवा करतात, त्या पोलीस कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे जेवण मिळत नाही. साधं पाणी देखील मिळणं मुश्किल होतं. तेव्हा आम्ही सर्व कुटुंबातील सदस्यांनी हा निर्णय घेतला. हे आता लॉकडाऊनसंपेपर्यंत हे सुरू ठेवणार आहोत, असा शब्द त्यांनी दिला. रस्त्यावर सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणाऱ्या देवदूतांच्या सेवेमुळे जगताप कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
First published:

पुढील बातम्या